पालक प्रबोधन

  • भावंडे

    एका आईबापाच्या पोटची, एका घरात वाढलेली, जन्मापासून एकमेकांच्या अत्यंत निकट संबंधांत आलेली अशी भावंडे असतात. आपल्या भावनामय मनास असे वाटते की बाल्यावस्थेपासून एकत्र वाढलेली, एकाच आईचे दूध प्यालेली, एकाच पित्याच्या प्रेमछत्राखाली मोठी झालेली भावंडे स्वाभाविकपणेच एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारी असतात – नव्हे, असलीच पाहिजेत. परंतु जरा सूक्ष्म निरीक्षण केले असता सहज दिसून येईल की भावंडांचे

    पुढे वाचा →


  • मुलांच्यामध्ये काही काही दुर्गुण अथवा वाईट खोडी पुष्कळदा दिसून येतात. मुलींच्या पेक्षाही काही गोष्टी मुलांच्यात फार आढळतात, त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत. १. बढाईखोरपणा – शाळेतली चार मुले एकत्र बसून गप्पा गोष्टी चालल्या असल्या म्हणजे त्यांत एखादा असा असतो की, सारख्या बढाया मारीत असतो. पहिल्या पहिल्यांदा इतर मुलांवर त्याच्या बोलण्याचा परिणाम होतो, पण पुढे त्यांना

    पुढे वाचा →


  • मुले खेळता खेळता भांडू लागतात अशा वेळी त्यांच्या भांडणात मोठ्या मंडळीनी मध्ये पडून त्यांचा तंटा तोडावा की नाही ? प्रश्न विचार करण्याजोगा आहे. मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे असे मानणारे म्हणतील की, “मुलांना मोकळे असू द्या. मध्ये पडू नका.”असे म्हणण्यात बराच सत्यांश आहे. जेथे मोठी मंडळी मध्ये पडून भांडण मिटवण्यास जातात तेथे पुष्कळदा मुलांच्या मूळ भांडणात

    पुढे वाचा →


ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.