बालशिक्षण

  • शिक्षणाचे क्षेत्र

    कोणी म्हणते, “ही संस्था चांगली. म्हणून आमच्या मुलाला येथे ठेवण्यास मुद्दामच आलो. तो अगदी पार बिघडला आहे. तरी त्याचे चारित्र्य उत्तम व्हावे म्हणून तुमच्या शाळेत ठेवण्यास आलो.” कोणी म्हणते, “तुमची शाळा फार नावाजली आहे. तेव्हा म्हटले आमचा मुलगा येथे लवकर लवकर शिकेल. तुमच्या येथे एक वर्षात दोन इयत्ता करवून घेता ना?” कोणी म्हणते, “आमच्या मुलाने…

    read more

  • घर व शाळा (भाग २)

    लहान मुले घरी असावीत की शाळेत ? घरी किती वेळ व शाळेत किती वेळ ? अडीच तीन वर्षांनंतर मुलांनी घर सोडून अंगणात जावे व त्याहीपलीकडे वाटल्यास जावे. हा स्वाभाविक क्रम आहे. त्यावेळी घराच्या अंगणासारखीच जर शाळा असली तर मुलांनी अवश्य शाळेत जावे. शाळेचा यंत्रवतपणा; शाळेची ठोकून बसविलेली शिस्त; शाळेचा नको असलेला अभ्यास करवून घेण्याचे कर्तव्य,…

    read more

  • घर व शाळा (भाग १)

    घर व शाळा या एकमेकांना पूरक संस्था असून या दोहोमध्ये ओढाताण कित्येक वर्षापासून चालू आहे. शाळा फारच उत्तम करावीशी वाटते असे शिक्षक शक्य तितकी अधिक कामे व व्यवसाय शाळेतच ठेवू पाहातात. ज्यांना घराचे महत्त्व अधिक वाटते ते शाळा शक्य तितका थोडा वेळ देण्याच्या मताची असतात. त्यामुळे २४ तासांची म्हणजे वसतिगृहांत राहणाऱ्या मुलांचीच शाळा असावी ह्या…

    read more

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.