ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.


  • धाकट्या बाबूला माझ्या हातांतून टॉवेल घ्यावयाचा होता. माझ्यापुढे येऊन माझ्या हातातून तो ओढू लागला. मी जरा घट्ट पकडून ठेवला व तो खेचाखेची करू लागला. बाबूच्या मदतीला लवकरच कमू आली व वसंतही येऊन पोहोचला. धाकटी शरयूही मधे मधे लुडबुडत होती. थोड्यात वेळात ओढाओढीला खेळाचे रूप आले. सर्वजण टॉवेल ओढू लागली व…

    Read More / पुढे वाचा →: खेळांतील स्पर्धा
  • Translated from the original Marathi article ‘He paani ahe ho’, published in Shikshan Patrika, October 1936 One afternoon, a four-year-old girl was deeply absorbed at home in drawing with her pencil and paper. At first, the drawings appeared to be random scribbles. After making several such drawings, one picture seemed…

    Read More / पुढे वाचा →: This is Water!
  • कोणी म्हणते, “ही संस्था चांगली. म्हणून आमच्या मुलाला येथे ठेवण्यास मुद्दामच आलो. तो अगदी पार बिघडला आहे. तरी त्याचे चारित्र्य उत्तम व्हावे म्हणून तुमच्या शाळेत ठेवण्यास आलो.” कोणी म्हणते, “तुमची शाळा फार नावाजली आहे. तेव्हा म्हटले आमचा मुलगा येथे लवकर लवकर शिकेल. तुमच्या येथे एक वर्षात दोन इयत्ता करवून घेता…

    Read More / पुढे वाचा →: शिक्षणाचे क्षेत्र
  • एका आईबापाच्या पोटची, एका घरात वाढलेली, जन्मापासून एकमेकांच्या अत्यंत निकट संबंधांत आलेली अशी भावंडे असतात. आपल्या भावनामय मनास असे वाटते की बाल्यावस्थेपासून एकत्र वाढलेली, एकाच आईचे दूध प्यालेली, एकाच पित्याच्या प्रेमछत्राखाली मोठी झालेली भावंडे स्वाभाविकपणेच एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारी असतात – नव्हे, असलीच पाहिजेत. परंतु जरा सूक्ष्म निरीक्षण केले असता…

    Read More / पुढे वाचा →: भावंडे
  • मुलांच्यामध्ये काही काही दुर्गुण अथवा वाईट खोडी पुष्कळदा दिसून येतात. मुलींच्या पेक्षाही काही गोष्टी मुलांच्यात फार आढळतात, त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत. १. बढाईखोरपणा – शाळेतली चार मुले एकत्र बसून गप्पा गोष्टी चालल्या असल्या म्हणजे त्यांत एखादा असा असतो की, सारख्या बढाया मारीत असतो. पहिल्या पहिल्यांदा इतर मुलांवर त्याच्या बोलण्याचा…

    Read More / पुढे वाचा →: मुलांचे अवगुण
  • (Translated from original Marathi article ‘Mulanna Kase Shikval?’ published in Shikshan Patrika, Year 1, Issue 11, April 1934) Séguin was a French educationist who worked with children with intellectual disabilities. While teaching them, had to proceed without skipping even a single step. The three steps he developed have proven very…

    Read More / पुढे वाचा →: How Will You Teach Children?
  • मूक-वाचन म्हणजे मनात वाचणे व मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे होय. या दोघांमध्ये व्यक्तीला स्वत:ला मूक-वाचन अधिक उपयोगी आहे. तरीपण मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचता येण्याचीही जरूर आहेच. मात्र मूकवाचनास  प्रथम स्थान द्यावे व मुखवाचनास त्यानंतर स्थान मिळावे. माँटेसोरी पद्धतीत योजलेले चिठ्ठी वाचन मूल करू लागले म्हणजे तेथेच त्याच्या मूक-वाचनास सुरुवात होते…

    Read More / पुढे वाचा →: मुखवाचन     
  • एके दिवशी बालमंदिरात एक ५ वर्षाचा मुलगा भोवरा दोरी घेऊन आला. त्या दिवशी खोलीमध्ये कुठल्याच कामाकडे त्याचे लक्ष लागत नव्हते. जरासे इकडे तिकडे हिडून रावसाहेबाने थोड्याच वेळात आपला भोवरा बाहेर काढला व झपदिशी जमिनीवर फेकला.  भोवरा भर भर फिरू लागला. खोलीमधील त्या छोट्या विद्यार्थ्यांस ही एक नवलाची गोष्ट वाटली. भोवरा…

    Read More / पुढे वाचा →: शाळेत भोवरा
  • “तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे…

    Read More / पुढे वाचा →: बालकांचा व्यायाम
  • There was a girl in our kindergarten. In the course of casual conversation, the topic of dreams came up. The girl said, “You know, I often dream of a witch. And then I get really scared.” “Ah, maybe it’s the witches from those fairy tales you read,” someone suggested. “What does…

    Read More / पुढे वाचा →: The Witch in the Dream