-
मनाने लेखन
मनात विचार करणे, मग तो शब्दांत अथवा वाक्यात बसवणे व नंतर ते लिहून काढणे असे तीन प्रकार मनाने लेखनात येतात. प्रथम मनात विचार आले पाहिजेत. मग ते भाषेत बसविता आले पाहिजेत व ती भाषा लिहिता आली पाहिजे. अनुलेखन व श्रुतलेखन म्हणजे पाहून पाहून व ऐकून लिहिता येऊ लागले म्हणजे लेखन बरेचसे पक्के होते. फक्त या…
-
गणिताची सुरुवात
गणित म्हणजे गणणे अथवा मोजणे. गणिताची सुरुवात मोजण्यापासून होते. गणित शिक्षण सफल झाले असे केव्हा म्हणता येईल? गणिताविषयी अभिरुची उत्पन्न झाली, किंवा सहज पडल्या पडल्या अथवा चालता बोलता गणिती प्रश्न मनात घोळू लागले म्हणजे एकंदरीत गणिताची दृष्टी झाली, तरच ते शिक्षण सफल झाले असे म्हणता येईल. आपल्या आसपास स्थळ आहे, काळ आहे, संख्या आहे. पदार्थांना…
-
मुखवाचन
मूक-वाचन म्हणजे मनात वाचणे व मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे होय. या दोघांमध्ये व्यक्तीला स्वत:ला मूक-वाचन अधिक उपयोगी आहे. तरीपण मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचता येण्याचीही जरूर आहेच. मात्र मूकवाचनास प्रथम स्थान द्यावे व मुखवाचनास त्यानंतर स्थान मिळावे. माँटेसोरी पद्धतीत योजलेले चिठ्ठी वाचन मूल करू लागले म्हणजे तेथेच त्याच्या मूक-वाचनास सुरुवात होते व तेथेच मुखवाचनासही सुरुवात होते.…
