-
लहान मुलांच्या वाईट सवयी
पुष्कळ आईबापांना मुलांना अगदी लहान वयात वाईट सवयी कशा लागतात ते लक्षात येत नाही. पुष्कळांचे लक्षच नसते. तर पुष्कळांना कल्पनाच नसते. माझ्या अनुभवातले एक लक्षवेधक उदाहरण आईबापांच्या माहितीसाठी देते. वाचलेल्या उदाहरणापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण मनावर विशेष परिणाम करते. पुस्तकात पूर्वी वाचलेले होते. पण पाहिलेले हे प्रथमच. एक सव्वादोन अडीच वर्षाचा मुलगा होता. संधी मिळाली की…
-
भावंडे
एका आईबापाच्या पोटची, एका घरात वाढलेली, जन्मापासून एकमेकांच्या अत्यंत निकट संबंधांत आलेली अशी भावंडे असतात. आपल्या भावनामय मनास असे वाटते की बाल्यावस्थेपासून एकत्र वाढलेली, एकाच आईचे दूध प्यालेली, एकाच पित्याच्या प्रेमछत्राखाली मोठी झालेली भावंडे स्वाभाविकपणेच एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारी असतात – नव्हे, असलीच पाहिजेत. परंतु जरा सूक्ष्म निरीक्षण केले असता सहज दिसून येईल की भावंडांचे…
-
मुलांचे अवगुण
मुलांच्यामध्ये काही काही दुर्गुण अथवा वाईट खोडी पुष्कळदा दिसून येतात. मुलींच्या पेक्षाही काही गोष्टी मुलांच्यात फार आढळतात, त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत. १. बढाईखोरपणा – शाळेतली चार मुले एकत्र बसून गप्पा गोष्टी चालल्या असल्या म्हणजे त्यांत एखादा असा असतो की, सारख्या बढाया मारीत असतो. पहिल्या पहिल्यांदा इतर मुलांवर त्याच्या बोलण्याचा परिणाम होतो, पण पुढे त्यांना…
