-
स्पर्धा व चढाओढ
“चढाओढ असल्याशिवाय मुले चुरशीने अभ्यास कसा करणार ? अधिक मेहनत घेऊन अभ्यास करायला मुलांना काही तरी असे तत्त्व असलेच पाहिजे. नाहीतर त्यात काही मजा वाटत नाही.” सामान्यतः सर्व पालकांचे मत असेच असते व पुष्कळशा शिक्षकांचेही तसेच असते. “धावा धावा. पाहू कोण पुढे जाते ते. सर्वात पुढे जाईल त्याला बक्षीस!” असे शब्द जवळ जवळ सर्वाच्या तोंडी…
-
भयमुक्ती
निर्भयता हा नव्या युगाचा मुद्रालेख आहे. आजचे शिक्षणशास्त्री म्हणतात, “बालकांना कसलीच भीती घालू नका.” शहाणे आणि समजूतदार आईबापदेखील आपली बालके निर्भय व्हावीत म्हणून अनेक तऱ्हेचे उपाय करीत आहेत. आजची बालके निर्भय म्हणजे उद्याची मनुष्यजाति निर्भय. नव्या युगाची पिढी ज्ञानाच्या पायावर उभारलेले निर्भय जीवन जगण्याची आकांक्षा धरीत आहे. वैज्ञानिक अथवा ज्ञानाच्या प्रगतीबरोबर भयाचा अस्त होत जावा,…
