-
बालशतकाची सुरुवात
ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही त्याचेबद्दल काही आस्था नव्हती. आणि…
-
नूतन बाल शिक्षण
(पुणे येथील संमेलनांतील श्री ताराबाई मोडकांचे अध्यक्षीय भाषण) प्रास्ताविक गुरुवर्य अण्णा, सौ. मालिनीबाई परांजपे व बंधु भगिनींनो, आजच्या शुभदिनी महाराष्ट्राच्या राजधानीवजा असलेल्या या पुण्यनगरीत बालशिक्षणाचे हे संमेलन प्रथमच भरत आहे. पुणे शहर हे आपल्या प्रांताचे विद्यापीठ आहे. येथे आपल्या थोर देशनेत्यांनी आपल्या राष्ट्रकार्यास प्रथम शिक्षणापासून सुरुवात करण्यासाठी मोठमोठ्या शिक्षणसंस्था स्थापल्या व राष्ट्रोद्धाराचे हे पवित्र कार्य…
-
बालशिक्षण महाग आहे का?
बालशिक्षण महाग आहे असे दिसते. पण खरे पाहता ते महाग नाही. उलट बालशिक्षणाचा आधार हाच फार महाग पडतो आहे. आपण त्या दृष्टीने हिशेब करीत नाही. म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. आज प्राथमिक शिक्षणाचा सर्वत्र प्रसार करायचा आहे व ते फुकट मिळेल असे करावयचे हे काम सर्व प्रांतांनी हाती घेतले आहे. सहा वर्षानंतर शिक्षणाची सुरुवात होते.…
