-
हे आपले अन हे दुसऱ्याचे
लक्ष्मी स्वतःच्या वस्तू जपून ठेवण्यात फारच दक्ष. वयाने केवळ चार वर्षाची मुलगी. अन् दिसायला तरत्याहीपेक्षा आणखी लहान. दुसऱ्या तिच्या इतर अवतारावरून तिला फार बुद्धिवान नाही म्हणता यायचे; पणस्वत:च्या वस्तू जीव की प्राणासारख्या वापरण्यात तिच्या बुद्धीची कुशाग्रता विशेष दिसून यायची. आपली वस्तूती कुठे कधी विसरायची नाही. आपल्या वस्तूला कधी हात देखील ती दुसऱ्याला लावू द्यायची नाही.…
-
मुले का रडतात?
(१) एका घरात रोज संध्याकाळ झाली की मुले किरकिर करायची, रडायची आणि मगआईकडून त्या मुलांना मार मिळायचा. त्यामुळे अधिक रडत ओरडत अखेर ती निजायची.रडायचे कारण काय असेल?कारण भुकेचे दु:ख होते. अशी आईची सवय की ती स्वयंपाकाला लवकर लागायचीच नाही.खेळासाठी बालकांना कितीतरी मोकळी जागा होती. खेळायला देखील कसल्याच प्रकारची त्यांनामनाई नव्हती. तेव्हा ही मुले दिवसभर कुदाकुदी,…
-
स्वप्नातील डाकीण
आमच्या बालमंदिरात एक मुलगी होती. सहज इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू असतास्वप्नाच्या गोष्टी निघाल्या. तेव्हा ती मुलगी म्हणते, “मला किनई नेहमी डाकिणीची स्वप्नेपडतात आणि मग मी अशी घाबरून जाते.” “हं त्या परीच्या गोष्टी वाचतेस त्यातल्या डाकिणीयेत असतील तुझ्या स्वप्नात. कशी असते ग डाकीण तुझी?” जरा आठवून ती मुलगी म्हणते,“किनई माझ्या स्वप्नातली डाकीण थोडी थोडी माझ्या आईसारखी…
