-
कोणी म्हणते, “ही संस्था चांगली. म्हणून आमच्या मुलाला येथे ठेवण्यास मुद्दामच आलो. तो अगदी पार बिघडला आहे. तरी त्याचे चारित्र्य उत्तम व्हावे म्हणून तुमच्या शाळेत ठेवण्यास आलो.” कोणी म्हणते, “तुमची शाळा फार नावाजली आहे. तेव्हा म्हटले आमचा मुलगा येथे लवकर लवकर शिकेल. तुमच्या येथे एक वर्षात दोन इयत्ता करवून घेता ना?” कोणी म्हणते, “आमच्या मुलाने
-
लहान मुले घरी असावीत की शाळेत ? घरी किती वेळ व शाळेत किती वेळ ? अडीच तीन वर्षांनंतर मुलांनी घर सोडून अंगणात जावे व त्याहीपलीकडे वाटल्यास जावे. हा स्वाभाविक क्रम आहे. त्यावेळी घराच्या अंगणासारखीच जर शाळा असली तर मुलांनी अवश्य शाळेत जावे. शाळेचा यंत्रवतपणा; शाळेची ठोकून बसविलेली शिस्त; शाळेचा नको असलेला अभ्यास करवून घेण्याचे कर्तव्य,
-
घर व शाळा या एकमेकांना पूरक संस्था असून या दोहोमध्ये ओढाताण कित्येक वर्षापासून चालू आहे. शाळा फारच उत्तम करावीशी वाटते असे शिक्षक शक्य तितकी अधिक कामे व व्यवसाय शाळेतच ठेवू पाहातात. ज्यांना घराचे महत्त्व अधिक वाटते ते शाळा शक्य तितका थोडा वेळ देण्याच्या मताची असतात. त्यामुळे २४ तासांची म्हणजे वसतिगृहांत राहणाऱ्या मुलांचीच शाळा असावी ह्या
