बालमानस

  • धाकट्या बाबूला माझ्या हातांतून टॉवेल घ्यावयाचा होता. माझ्यापुढे येऊन माझ्या हातातून तो ओढू लागला. मी जरा घट्ट पकडून ठेवला व तो खेचाखेची करू लागला. बाबूच्या मदतीला लवकरच कमू आली व वसंतही येऊन पोहोचला. धाकटी शरयूही मधे मधे लुडबुडत होती. थोड्यात वेळात ओढाओढीला खेळाचे रूप आले. सर्वजण टॉवेल ओढू लागली व हळूहळू सर्वजण मिळून मलाच ओढून

    पुढे वाचा →


  • एके दिवशी बालमंदिरात एक ५ वर्षाचा मुलगा भोवरा दोरी घेऊन आला. त्या दिवशी खोलीमध्ये कुठल्याच कामाकडे त्याचे लक्ष लागत नव्हते. जरासे इकडे तिकडे हिडून रावसाहेबाने थोड्याच वेळात आपला भोवरा बाहेर काढला व झपदिशी जमिनीवर फेकला.  भोवरा भर भर फिरू लागला. खोलीमधील त्या छोट्या विद्यार्थ्यांस ही एक नवलाची गोष्ट वाटली. भोवरा आणणाऱ्या बालकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती,

    पुढे वाचा →


  • एक चार वर्षाची मुलगी दुपारचे वेळी आपले घरी आपल्या पेन्सिली कागद घेऊन चित्र काढण्यात गढलीहोती. दिसण्यात वेड्यावाकड्या रेघोट्या दिसत होत्या. अशी काही बरीचशी चित्रे बराच वेळ काढल्यावर एकचित्र तिच्या मनाजोगते निघालेले दिसले; कारण तिच्या चेहऱ्यावर मनाजोगे निर्माण केल्याचा संतोष वआनंद दिसत होता. ते चित्र घेऊन ती आपल्या आईकडे गेली व तिला सांगू लागली “हे बघ

    पुढे वाचा →


ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.