-
रोज उठून हे काय ?
रमा रोज उठून दुपारी बालमंदिरात परसाकडेल जायची. आणि जायची तरी कशी ? एकटी दुकटी नव्हे, तरएक टोळी जमवून आणि त्या टोळीचे आधिपत्य स्वत:कडे घेऊन अगदी लष्करी थाटात.संगीताचा पहिला तास संपला की रमाचा हा जवळ जवळ दुसऱ्या सबंध तासाचा एक आपला कार्यक्रमचहोऊन बसलेला. पहिल्यांदा ती आपल्या सैनिकांची व्यवस्थित जामजमाव करायची. काही मैत्रिणी व मित्रतिला असे मिळत…
