

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.
(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)
आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.
१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.
(Translated from original Marathi article ‘Mulanna Kase Shikval?’ published in Shikshan Patrika, Year 1, Issue 11, April 1934) Séguin was a French educationist who worked with children with intellectual disabilities. While teaching them, had to proceed without skipping even a single step. The three steps he developed have proven very…
मूक-वाचन म्हणजे मनात वाचणे व मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे होय. या दोघांमध्ये व्यक्तीला स्वत:ला मूक-वाचन अधिक उपयोगी आहे. तरीपण मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचता येण्याचीही जरूर आहेच. मात्र मूकवाचनास प्रथम स्थान द्यावे व मुखवाचनास त्यानंतर स्थान मिळावे. माँटेसोरी पद्धतीत योजलेले चिठ्ठी वाचन मूल करू लागले म्हणजे तेथेच त्याच्या मूक-वाचनास सुरुवात होते…
एके दिवशी बालमंदिरात एक ५ वर्षाचा मुलगा भोवरा दोरी घेऊन आला. त्या दिवशी खोलीमध्ये कुठल्याच कामाकडे त्याचे लक्ष लागत नव्हते. जरासे इकडे तिकडे हिडून रावसाहेबाने थोड्याच वेळात आपला भोवरा बाहेर काढला व झपदिशी जमिनीवर फेकला. भोवरा भर भर फिरू लागला. खोलीमधील त्या छोट्या विद्यार्थ्यांस ही एक नवलाची गोष्ट वाटली. भोवरा…
“तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे…
There was a girl in our kindergarten. In the course of casual conversation, the topic of dreams came up. The girl said, “You know, I often dream of a witch. And then I get really scared.” “Ah, maybe it’s the witches from those fairy tales you read,” someone suggested. “What does…
लहान मुले घरी असावीत की शाळेत ? घरी किती वेळ व शाळेत किती वेळ ? अडीच तीन वर्षांनंतर मुलांनी घर सोडून अंगणात जावे व त्याहीपलीकडे वाटल्यास जावे. हा स्वाभाविक क्रम आहे. त्यावेळी घराच्या अंगणासारखीच जर शाळा असली तर मुलांनी अवश्य शाळेत जावे. शाळेचा यंत्रवतपणा; शाळेची ठोकून बसविलेली शिस्त; शाळेचा नको…
घर व शाळा या एकमेकांना पूरक संस्था असून या दोहोमध्ये ओढाताण कित्येक वर्षापासून चालू आहे. शाळा फारच उत्तम करावीशी वाटते असे शिक्षक शक्य तितकी अधिक कामे व व्यवसाय शाळेतच ठेवू पाहातात. ज्यांना घराचे महत्त्व अधिक वाटते ते शाळा शक्य तितका थोडा वेळ देण्याच्या मताची असतात. त्यामुळे २४ तासांची म्हणजे वसतिगृहांत…