

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.
(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)
आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.
१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.
एक चार वर्षाची मुलगी दुपारचे वेळी आपले घरी आपल्या पेन्सिली कागद घेऊन चित्र काढण्यात गढलीहोती. दिसण्यात वेड्यावाकड्या रेघोट्या दिसत होत्या. अशी काही बरीचशी चित्रे बराच वेळ काढल्यावर एकचित्र तिच्या मनाजोगते निघालेले दिसले; कारण तिच्या चेहऱ्यावर मनाजोगे निर्माण केल्याचा संतोष वआनंद दिसत होता. ते चित्र घेऊन ती आपल्या आईकडे गेली व…
लक्ष्मी स्वतःच्या वस्तू जपून ठेवण्यात फारच दक्ष. वयाने केवळ चार वर्षाची मुलगी. अन् दिसायला तरत्याहीपेक्षा आणखी लहान. दुसऱ्या तिच्या इतर अवतारावरून तिला फार बुद्धिवान नाही म्हणता यायचे; पणस्वत:च्या वस्तू जीव की प्राणासारख्या वापरण्यात तिच्या बुद्धीची कुशाग्रता विशेष दिसून यायची. आपली वस्तूती कुठे कधी विसरायची नाही. आपल्या वस्तूला कधी हात देखील…
(१) एका घरात रोज संध्याकाळ झाली की मुले किरकिर करायची, रडायची आणि मगआईकडून त्या मुलांना मार मिळायचा. त्यामुळे अधिक रडत ओरडत अखेर ती निजायची.रडायचे कारण काय असेल?कारण भुकेचे दु:ख होते. अशी आईची सवय की ती स्वयंपाकाला लवकर लागायचीच नाही.खेळासाठी बालकांना कितीतरी मोकळी जागा होती. खेळायला देखील कसल्याच प्रकारची त्यांनामनाई नव्हती.…
लहान मूल हळू हळू उभे राहाते व हलकेच एक एक पाऊल पुढे टाकून चालावयास लागते. आईला त्याचे कौतुक वाटते. घरातील सर्वजण कौतुक करतात.’अरे पाहा, बाळ चालायला लागला!” म्हणून सर्व त्यास उत्तेजन देतात. मूलही हौशी-हौशीने चालू लागते. झोक जातो, पडते, पुन्हा उभे राहते, पुन्हा चालते. पुन्हा पडते, पुन्हा उठून चालू लागते. अशा प्रकारे…
मित्रहो, दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्भके म्हणतात. पुढे दोन ते सहा-सात वर्षांपर्यंतची छोटी मुले म्हणजे शिशु. आपली मुले आधी आपल्या अंगाखांद्यावर व पाळण्यात वाढत असतात. ती जरा मोठी झाली की अंगणात खेळू लागतात. तेच शिशुपण आपण जरा बारकाईने पाहू लागलो तर ती कशी वाढत असतात ते आपल्याला दिसते. आज मी शिशुपणात…
मूल बोलू लागते. आपण घरातली मंडळी त्यास शिकवू लागतो. मूल पा-प्पा-प्पा बाब्बाब्बा, मम्मम्म करते. आपण शिकवतो बाबा म्हण, मामा म्हण, मं मं म्हण.पहिल्यांदा मुलांच्या तोंडात नुसते अर्थरहित उच्चार असतात. पुढे ते अर्थ असलेले शब्द बोलू लागते. कित्येक शब्द आपल्यापासून ते शिकून म्हणते, तर त्याच्या कित्येक शब्दांना आपण अर्थ देतो. म्हणजे…
ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही…