

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.
(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)
आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.
१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.
मूल बोलू लागते. आपण घरातली मंडळी त्यास शिकवू लागतो. मूल पा-प्पा-प्पा बाब्बाब्बा, मम्मम्म करते. आपण शिकवतो बाबा म्हण, मामा म्हण, मं मं म्हण.पहिल्यांदा मुलांच्या तोंडात नुसते अर्थरहित उच्चार असतात. पुढे ते अर्थ असलेले शब्द बोलू लागते. कित्येक शब्द आपल्यापासून ते शिकून म्हणते, तर त्याच्या कित्येक शब्दांना आपण अर्थ देतो. म्हणजे…
ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही…
(पुणे येथील संमेलनांतील श्री ताराबाई मोडकांचे अध्यक्षीय भाषण) प्रास्ताविक गुरुवर्य अण्णा, सौ. मालिनीबाई परांजपे व बंधु भगिनींनो, आजच्या शुभदिनी महाराष्ट्राच्या राजधानीवजा असलेल्या या पुण्यनगरीत बालशिक्षणाचे हे संमेलन प्रथमच भरत आहे. पुणे शहर हे आपल्या प्रांताचे विद्यापीठ आहे. येथे आपल्या थोर देशनेत्यांनी आपल्या राष्ट्रकार्यास प्रथम शिक्षणापासून सुरुवात करण्यासाठी मोठमोठ्या शिक्षणसंस्था स्थापल्या…
“चढाओढ असल्याशिवाय मुले चुरशीने अभ्यास कसा करणार ? अधिक मेहनत घेऊन अभ्यास करायला मुलांना काही तरी असे तत्त्व असलेच पाहिजे. नाहीतर त्यात काही मजा वाटत नाही.” सामान्यतः सर्व पालकांचे मत असेच असते व पुष्कळशा शिक्षकांचेही तसेच असते. “धावा धावा. पाहू कोण पुढे जाते ते. सर्वात पुढे जाईल त्याला बक्षीस!” असे…
बालशिक्षण महाग आहे असे दिसते. पण खरे पाहता ते महाग नाही. उलट बालशिक्षणाचा आधार हाच फार महाग पडतो आहे. आपण त्या दृष्टीने हिशेब करीत नाही. म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. आज प्राथमिक शिक्षणाचा सर्वत्र प्रसार करायचा आहे व ते फुकट मिळेल असे करावयचे हे काम सर्व प्रांतांनी हाती घेतले आहे.…
“आमचा मुलगा इतके दिवस शाळेत येतो आहे. पण त्या मानाने त्याच्यात काहीच प्रगती दिसत नाही. पाच वर्षाचा पुरा झाला तरी अद्याप अडखळत वाचतो.” “अहो तो चित्र खूप काढतो. सध्या त्याचे लक्ष चित्रांकडे विशेष आहे. म्हणून लिहिण्या वाचण्यात जरा मागे दिसतो. लिहिण्या वाचण्यात जाईल पुढे तो. काळजी करण्यासारखे नाही.” “अहो चित्रे…
शिष्ट बालकथांच्या शेवटी तात्पर्य रूपाने काही नीतीबोध असतो. पण आजीबाईंच्या बालकथांच्या शेवटी पुष्कळदा काही तरी ग्राम्य विनोद असतो. उदाहरणार्थ ऊ टू ची गोष्टच घ्या. शेवटी काय? तर पादू कशी? ढम् दिशी! कोल्हा म्हातारीची बोरे खाऊन जात होता. त्या गोष्टीच्या शेवटीही असेच “या या कोल्होबा बोरं पिकली” “नाही नाही म्हातारे कुले…