

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.
(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)
आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.
१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.
निर्भयता हा नव्या युगाचा मुद्रालेख आहे. आजचे शिक्षणशास्त्री म्हणतात, “बालकांना कसलीच भीती घालू नका.” शहाणे आणि समजूतदार आईबापदेखील आपली बालके निर्भय व्हावीत म्हणून अनेक तऱ्हेचे उपाय करीत आहेत. आजची बालके निर्भय म्हणजे उद्याची मनुष्यजाति निर्भय. नव्या युगाची पिढी ज्ञानाच्या पायावर उभारलेले निर्भय जीवन जगण्याची आकांक्षा धरीत आहे. वैज्ञानिक अथवा ज्ञानाच्या…
सेग्विन हा एक फ्रेंच शिक्षण शास्त्री होता व त्याने मंदबुद्धीच्या मुलांमध्ये काम केले. त्यामुळे मध्ये एकही पायरी न गाळता त्याला काम करावे लागत असे. या तीन पदांचा उपयोग सामान्य बुद्धीच्या (Normal) मुलांमध्येही फार उत्तम दिसून आला आहे. यांचा उपयोग जितका शिक्षकांना आहे तितकाच आई-बाबांनाही आहे. खरे म्हटले असता ज्यांचा ज्यांचा…
आजकाल आमच्या शाळेत ऊ टू ची गोष्ट खूप चालते आहे. शाळेत गेल्याबरोबर मुले “बाई, गोष्ट सांगा ना” म्हणून पाठीस लागत असतात व कोणाची गोष्ट सांगू म्हणून विचारले की “ऊ टू” चा असा सर्वांचा एक आवाज येतो. ऊ टू ची गोष्ट घरीही मुलांना फार आवडते व शाळेतही जर सांगितली तर ती…
आमच्या बालमंदिरात एक मुलगी होती. सहज इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू असतास्वप्नाच्या गोष्टी निघाल्या. तेव्हा ती मुलगी म्हणते, “मला किनई नेहमी डाकिणीची स्वप्नेपडतात आणि मग मी अशी घाबरून जाते.” “हं त्या परीच्या गोष्टी वाचतेस त्यातल्या डाकिणीयेत असतील तुझ्या स्वप्नात. कशी असते ग डाकीण तुझी?” जरा आठवून ती मुलगी म्हणते,“किनई माझ्या स्वप्नातली…
रमा रोज उठून दुपारी बालमंदिरात परसाकडेल जायची. आणि जायची तरी कशी ? एकटी दुकटी नव्हे, तरएक टोळी जमवून आणि त्या टोळीचे आधिपत्य स्वत:कडे घेऊन अगदी लष्करी थाटात.संगीताचा पहिला तास संपला की रमाचा हा जवळ जवळ दुसऱ्या सबंध तासाचा एक आपला कार्यक्रमचहोऊन बसलेला. पहिल्यांदा ती आपल्या सैनिकांची व्यवस्थित जामजमाव करायची. काही…