बालसाहित्य

  • गोष्टींतील ग्राम्यता

    शिष्ट बालकथांच्या शेवटी तात्पर्य रूपाने काही नीतीबोध असतो. पण आजीबाईंच्या बालकथांच्या शेवटी पुष्कळदा काही तरी ग्राम्य विनोद असतो. उदाहरणार्थ ऊ टू ची गोष्टच घ्या. शेवटी काय? तर पादू कशी? ढम् दिशी! कोल्हा म्हातारीची बोरे खाऊन जात होता. त्या गोष्टीच्या शेवटीही असेच “या या कोल्होबा बोरं पिकली” “नाही नाही म्हातारे कुले भाजले” किंवा आता जरा शिष्ट…

    read more

  • ऊ टू ची गोष्ट

    आजकाल आमच्या शाळेत ऊ टू ची गोष्ट खूप चालते आहे. शाळेत गेल्याबरोबर मुले “बाई, गोष्ट सांगा ना” म्हणून पाठीस लागत असतात व कोणाची गोष्ट सांगू म्हणून विचारले की “ऊ टू” चा असा सर्वांचा एक आवाज येतो. ऊ टू ची गोष्ट घरीही मुलांना फार आवडते व शाळेतही जर सांगितली तर ती लगेच बालप्रिय होते असे अनुभवास…

    read more

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.