-
मूक-वाचन म्हणजे मनात वाचणे व मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे होय. या दोघांमध्ये व्यक्तीला स्वत:ला मूक-वाचन अधिक उपयोगी आहे. तरीपण मुख-वाचन म्हणजे मोठ्याने वाचता येण्याचीही जरूर आहेच. मात्र मूकवाचनास प्रथम स्थान द्यावे व मुखवाचनास त्यानंतर स्थान मिळावे. माँटेसोरी पद्धतीत योजलेले चिठ्ठी वाचन मूल करू लागले म्हणजे तेथेच त्याच्या मूक-वाचनास सुरुवात होते व तेथेच मुखवाचनासही सुरुवात होते.
-
“तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे तुमचे म्हणणे आहे की काय?”“नव्हे,
-
मागील लेखांत चित्रकामाचा ज्ञानार्जनाशी कसा निकट व महत्त्वाचा संबंध आहे त्यासंबंधी विचार केला. आता बालजीवनात चित्राचे स्थान पाहू या. आम्ही शाळेच्या मुलांस किहिम येथे पर्यटनास नेले. मुले समुद्र, नारळाची वाडी, डोंगर, बोट वगैरे गोष्टींनी इतकी खूश झाली की त्या सर्व गोष्टीची खोल छाप मनावर बसली. घरी आल्यावर त्यासंबंधी पुन्हा पुन्हा बोलली, भाषणे केली. वर्गात लेखनातही
