-
बालजीवनात चित्रकामाचे स्थान
मागील लेखांत चित्रकामाचा ज्ञानार्जनाशी कसा निकट व महत्त्वाचा संबंध आहे त्यासंबंधी विचार केला. आता बालजीवनात चित्राचे स्थान पाहू या. आम्ही शाळेच्या मुलांस किहिम येथे पर्यटनास नेले. मुले समुद्र, नारळाची वाडी, डोंगर, बोट वगैरे गोष्टींनी इतकी खूश झाली की त्या सर्व गोष्टीची खोल छाप मनावर बसली. घरी आल्यावर त्यासंबंधी पुन्हा पुन्हा बोलली, भाषणे केली. वर्गात लेखनातही…
-
भाषाशिक्षणाचा पाया
बालमंदिरात अडीच वर्षांपासून सहा वर्षे वयापर्यंतची मुले असतात. या मुलांचे सुद्धा भाषा शिक्षण असते. मुलांची अक्षरे पुरी झाली, लिहा-वाचायला लागली म्हणजेच भाषा शिक्षण सुरू होते, अशी कोणाचीही कल्पना असल्यास ती चुकीची आहे. भाषा ही काही नुसती लिहिण्या वाचण्याची गोष्ट नाही, पण मुख्यतः ती बोलण्याची आणि ऐकण्याची गोष्ट आहे. ऐकून ऐकून मूल भाषा शिकते. उच्चार शुद्धीवरच…
-
मुलांचे शब्दभांडार
मूल बोलू लागते. आपण घरातली मंडळी त्यास शिकवू लागतो. मूल पा-प्पा-प्पा बाब्बाब्बा, मम्मम्म करते. आपण शिकवतो बाबा म्हण, मामा म्हण, मं मं म्हण.पहिल्यांदा मुलांच्या तोंडात नुसते अर्थरहित उच्चार असतात. पुढे ते अर्थ असलेले शब्द बोलू लागते. कित्येक शब्द आपल्यापासून ते शिकून म्हणते, तर त्याच्या कित्येक शब्दांना आपण अर्थ देतो. म्हणजे आपला अर्थ व्यक्त करण्यासाठी ते…
