

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.
(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)
आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.
१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.
पुष्कळ आईबापांना मुलांना अगदी लहान वयात वाईट सवयी कशा लागतात ते लक्षात येत नाही. पुष्कळांचे लक्षच नसते. तर पुष्कळांना कल्पनाच नसते. माझ्या अनुभवातले एक लक्षवेधक उदाहरण आईबापांच्या माहितीसाठी देते. वाचलेल्या उदाहरणापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण मनावर विशेष परिणाम करते. पुस्तकात पूर्वी वाचलेले होते. पण पाहिलेले हे प्रथमच. एक सव्वादोन अडीच वर्षाचा…
A young child gradually learns to stand and then begins to walk, taking one small step at a time. The mother delights in this achievement. Everyone in the household admires it. “Look, the baby has started walking!” they exclaim, encouraging the child. The child, too, walks with enthusiasm. It loses…
मनात विचार करणे, मग तो शब्दांत अथवा वाक्यात बसवणे व नंतर ते लिहून काढणे असे तीन प्रकार मनाने लेखनात येतात. प्रथम मनात विचार आले पाहिजेत. मग ते भाषेत बसविता आले पाहिजेत व ती भाषा लिहिता आली पाहिजे. अनुलेखन व श्रुतलेखन म्हणजे पाहून पाहून व ऐकून लिहिता येऊ लागले म्हणजे लेखन…
गणित म्हणजे गणणे अथवा मोजणे. गणिताची सुरुवात मोजण्यापासून होते. गणित शिक्षण सफल झाले असे केव्हा म्हणता येईल? गणिताविषयी अभिरुची उत्पन्न झाली, किंवा सहज पडल्या पडल्या अथवा चालता बोलता गणिती प्रश्न मनात घोळू लागले म्हणजे एकंदरीत गणिताची दृष्टी झाली, तरच ते शिक्षण सफल झाले असे म्हणता येईल. आपल्या आसपास स्थळ आहे,…
(Speech delivered on December 23, 1951, at the Kamgar Sabha program, aimed at mill workers and other labourers, broadcast from All India Radio, Mumbai. Translated from the original Marathi ‘Shaishava’.) Friends, Children up to two years of age are called infants. From two to six or seven years, they are…
धाकट्या बाबूला माझ्या हातांतून टॉवेल घ्यावयाचा होता. माझ्यापुढे येऊन माझ्या हातातून तो ओढू लागला. मी जरा घट्ट पकडून ठेवला व तो खेचाखेची करू लागला. बाबूच्या मदतीला लवकरच कमू आली व वसंतही येऊन पोहोचला. धाकटी शरयूही मधे मधे लुडबुडत होती. थोड्यात वेळात ओढाओढीला खेळाचे रूप आले. सर्वजण टॉवेल ओढू लागली व…